बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील १२ हजार कोटींचा घोटाळा आणि कोविड काळातील ३,५०० कोटींचा हिशेब गायब; मुंबईकरांच्या पैशावर डल्ला? 'कॅग'च्या अहवालाने उडवली खळबळ!
Videos"बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांनी ओढलेले ताशेरे आता समोर आले आहेत. नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत झालेल्या विविध कामांमध्ये तब्बल १२ हजार २४ कोटी रुपयांची अनियमितता आढळल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. विशेषतः कोविड-१९ महामारीच्या काळात झालेल्या ३,५०० कोटींहून अधिक खर्चाचा कोणताही स्पष्ट हिशेब उपलब्ध नाही, तसेच या खर्चाचे 'थर्ड पार्टी ऑडिट'देखील करण्यात आलेले नाही. निविदांशिवाय कंत्राटे देणे, कामात झालेला विलंब आणि नियोजनाचा अभाव यामुळे मुंबईकरांच्या कराच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. हा पैसा नेमका गेला कुठे? हा प्रश्न आता प्रत्येक मुंबईकर विचारत आहे. पाहा हा सविस्तर रिपोर्ट..." BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching