बीएमसी इलेक्शन : द ठाकरे 'कोलॅब' (Collab) आणि जेन-झीचा 'एक्झिट पोल'!
Articlesमुंबईतल्या एका आलिशान कॅफेमध्ये आर्यन आणि शनाया बसले आहेत. आर्यनच्या आयफोनवर 'ब्रेकिंग न्यूज' झळकते… "मुंबई वाचवण्यासाठी ठाकरे बंधूंचे 'महा-मर्जर'!" आर्यन: (डोळे विस्फारून) यो शनाया, चेक दिस आऊट! हे ठाकरे ब्रदर्स पुन्हा एकदा 'पॅचअप' मोडमध्ये आलेत का काय? टीव्हीवर तर जणू काही 'स्पिल्ट्सविला'चा ग्रँड फिनाले सुरू असल्यासारखा हाईप आहे! शनाया: (मोबाईलवर रिल्स स्क्रोल करत) ओह प्लीज आर्यन! हे तर अगदी त्या 'कार्दशियन' फॅमिली सारखं वाटतंय. प्रत्येक इलेक्शनच्या वेळी यांचा एक नवीन सीझन येतो. इट इज सो 'मिडीऑकर' यार! म्हणजे तू विचार कर, कालपर्यंत हे एकमेकांना 'रोस्ट' करत होते, आता अचानक 'ब्रो-कोड' आठवला? आर्यन: नाही गं, पण यावेळी विषय बीएमसीचा आहे. म्हणजे त्यांच्यासाठी तर आशियातली सर्वात मोठी 'पिगी बँक'! हे दोघं एकत्र येऊन म्हणतात की 'मराठी अस्मिता' धोक्यात आहे. हे तर अगदी एखाद्या जुन्या, फ्लॉप मुव्हीचा रिमेक काढल्यासारखं वाटतंय ना? शनाया: आय गेस, आता या 'नेपो-बेबीज'ना निवृत्त करायची वेळ आली आहे. मुंबईला आता 'वारसदार' नकोत, तर एखादा व्हिजनरी एक्झिक्युटर हवाय जो खरोखर काम करेल. हे दोघं म्हणजे जणू काही 'रिटायर्ड' स्टार्सनी एकत्र येऊन काढलेलं एखादं 'फ्युजन' आहे, ज्यात चव जुनीच आहे पण फक्त मार्केटिंग फंडा नवीन आहे. आर्यन: आणि ते 'अस्तित्वाची लढाई' वाला बॅनर पाहिलं का? ते वाचून असं वाटतंय जणू काही हे सामान्यांच्या अस्तित्वासाठी नाही, तर स्वतःच्या 'फॅमिली बिझनेस'च्या व्हॅल्युएशनसाठी लढतायत. इट इज सो 'क्रिंज' (Cringe) शनाया! मुंबई ही यांची काय प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का, की यांनी वाटाघाटी करून ती वाटून घ्यावी? शनाया: अगदी! जसं नाटकाचा पडदा पडायच्या आधी नट जोरात ओरडतात ना, तसंच हे ओरडतायत. पण थिअरी सिंपल आहे- अस्तित्व त्यांचं धोक्यात आहे, आपलं नाही. यांना फक्त ती 'किल्ली' हवीय जिने महापालिकेची तिजोरी उघडते. आर्यन: आणि ब्रो, या 'कोलाब'मध्ये फक्त मोठ्या साहेबांचं पॅच-अप नाहीये, तर त्यांचे 'वारसदार' सुद्धा आहेत. म्हणजे आदित्य आणि अमित! हे तर अगदी 'नेपो-बेबीज'च्या ए-लिस्टर मुव्हीसारखं वाटतंय. दोन्हीकडे फॅमिली लेगसी आहे, पण 'ओरिजनल कंटेंट'चा पत्ताच नाही. शनाया: ओह गॉड, आदित्य! तो तर सारखा 'क्लाइमेट चेंज' आणि 'शाश्वत विकास' (Sustainable Development) बद्दल बोलत असतो, जणू काही आपण लंडनमध्ये राहतोय. पण ब्रो, पावसाळ्यात जेव्हा मुंबई 'सबमरीन' (पाणबुडी) बनते, तेव्हा त्याचं हे व्हिजन खड्ड्यात जातं का? गेली इतकी वर्ष बीएमसी यांच्या ताब्यात होती, मग तेव्हा कोणतं ठोस धोरण आखलं होतं? आर्यन: फॅक्ट्स! आणि अमित ठाकरे? ते म्हणतात आम्ही 'तरुणांचे प्रश्न' सोडवू. पण कोणते प्रश्न? स्वतःच्या करियरचं इंजिन अजून प्लॅटफॉर्मवरच उभं आहे, मग ते मुंबईचं भविष्य कसं ट्रॅकवर आणणार? या दोन्ही 'नेपो-लीडर्स'कडे बघितलं ना शनाया, तर असं वाटतं की यांच्याकडे कोणतंही 'सॉलिड व्हिजन' नाहीये. फक्त वडिलांची पुण्याई वापरून 'सिम्युलेशन' गेम खेळतायत. शनाया: अगदी! तू मुंबईच्या कोणत्याच मोठ्या प्रश्नावर यांचं ठोस सोल्युशन पाहिलंस का? म्हणजे ट्रॅफिक, पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा हाऊसिंग... यावर यांच्याकडे फक्त 'इमोशनल स्पीचेस' आहेत. इट इज सो 'सरफेस-लेव्हल'...हे फक्त इन्स्टाग्रामवर चांगले दिसणारे 'एस्थेटिक' फोटो टाकतात, पण ग्राऊंड लेव्हलवर व्हिजन मात्र पूर्णपणे ब्लर आहे. आर्यन: हो ना! यांना वाटतं की बीएमसीच्या तिजोरीची किल्ली मिळणं म्हणजे 'लेव्हल अप' करणं आहे. पण त्यांना हे समजत नाहीये की मुंबईकरांना आता 'हेरिटेज' गप्पा नकोत, तर 'स्मार्ट सिटी'चं खरं काम हवंय. यांनी आजवर फक्त 'अडथळ्यांचं राजकारण' केलंय. मेट्रोला विरोध, प्रोजेक्ट्सना स्टे... हेच त्यांचं व्हिजन आहे का? दुसऱ्याने केलेल्या कामावर फुली मारणं याला 'डेव्हलपमेंट' म्हणत नाहीत. शनाया: टोटली 'क्रिंज'! हे दोघं म्हणजे जणू काही अशा स्टार्टअपचे फाऊंडर्स आहेत ज्यांच्याकडे 'फंडिंग' (बापाचं नाव) भरपूर आहे, पण 'प्रॉडक्ट' (व्हिजन) मात्र पूर्णपणे फ्लॉप आहे. या 'नेपो-ब्रदर्स'ना वाटतं की मुंबई म्हणजे एखादा 'प्ले-स्टेशन' आहे जिथे रिस्टार्ट बटण दाबलं की सगळं जुन्यासारखं होईल. पण ब्रो, पब्लिक आता शहाणी झालीय. आम्हाला 'वारसदार' नकोत, तर 'ग्राऊंड-ब्रेकर' हवेत ज्यांना मुंबईच्या गल्लीतल्या समस्या माहिती आहेत." आर्यन: ट्रुथ बॉम्ब! हे फक्त आपल्या 'फॅमिली बिझनेस'चं व्हॅल्युएशन वाढवायला एकत्र आलेत. या युतीमध्ये 'विकासाचा' रोडमॅप नाही, तर फक्त 'जहागीरदारी' वाचवण्याचा 'ब्लूप्रिंट' आहे. चल निघूया, नाहीतर यांच्या व्हिजनच्या गप्पा ऐकून माझं डोकं 'हँग' होईल! शनाया: क्रेझी! चल, बिल भरूया. आणि हो, बिल 'स्प्लिट' करूया... या ठाकरेंसारखी 'युती' नको… नाहीतर खाणार हे लोक आणि बिल भरणार मुंबईकर… BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching