कोहिनूरचा 'काळा' बाजार : कामगारांना केलं उद्ध्वस्त, अन् 'परिवारा'ने केला माल फस्त!
Videos"मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि घामाचा बाजार कसा मांडला जातो, हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ डोळे उघडून पहा! कोहिनूर मिल घोटाळा म्हणजे केवळ भ्रष्टाचार नाही, तर हजारो गिरणी कामगारांच्या आयुष्याची राखरांगोळी करून उभारलेला राजवाडा आहे. ज्या जमिनीवर मराठी कामगारांच्या कष्टाचा सुगंध यायचा, तिथून आज 'मातोश्री'च्या खास मर्जीतल्या लोकांच्या 'रिअल इस्टेट' साम्राज्याचा घाणेरडा वास येतोय. बिचारा कामगार पीएफ आणि ग्रॅच्युइटीसाठी रडत बसलाय आणि इकडे 'सत्तेच्या सावलीत' बसलेली मंडळी कोट्यवधींच्या जमिनी हडपून ढेकर देत आहेत. हे कुठलं 'मराठी प्रेम'? हा तर निव्वळ मराठी माणसाच्या पाठीत खुपसलेला खंजीर आहे! सत्तेचा वापर करून स्वतःची घरं भरणारी ही टोळी आता उघडी पडली आहे. लक्षात ठेवा, मुंबई महानगरपालिका ही तुमची खाजगी जहागीर नाही!" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching