"बाबा...!, पेंग्विन..ढिंचॅक..ढिंचॅक... अरेरे...! ईडी आली वेशीपाशी...!"
Videos"मुंबईकरांना खड्डे आणि पाणीकपातीचे चटके सोसावे लागत असताना, इकडे मात्र वेगळाच 'ढिंचक ढिंचक' कारभार सुरू आहे! या व्हिडीओमध्ये आपले युवराज पेंग्विनच्या वेशात आनंदाने उड्या मारताना दिसत आहेत. ""बाबा, मला पेंग्विन हवा"" या बालिश हट्टामुळे मुंबईच्या तिजोरीला जो चुना लावला आहे, त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, रिपोर्टनुसार मुंबईतील वातावरण सूट न झाल्याने एका पेंग्विनचा बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे मृत्यू झाला होता. तरीही निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आणि करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करून हे पेंग्विनचे लाड पुरवले जात आहेत. शहराच्या विकासावर बोलण्याची वेळ येते तेव्हा हे महाशय गायब असतात, पण पेंग्विनच्या नावाने नाचायचे असेल तर मात्र सर्वात पुढे! मुंबईची 'तुंबई' झाली तरी चालेल, पण युवराजांचा उत्साह कमी होता कामा नये, असाच काहीसा हा प्रकार आहे. यांची ही नाचगाणी आणि पेंग्विनचे हट्ट जोपर्यंत सुरू राहतील, तोपर्यंत मुंबईचा विकास केवळ स्वप्नच राहणार. बालिश हट्ट सोडा आणि लोकांच्या जिवाकडे लक्ष द्या! हेच जनतेला सांगायचे आहे." BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching