Home Articles Comics Videos
बीएमसी इलेक्शन : द ठाकरे 'कोलॅब' (Collab) आणि जेन-झीचा 'एक्झिट पोल'!
गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याचा मलिदा कुणी लाटला?
पर्यावरणाचा मुखवटा, बीएमसीतील निर्णयांचा गोंधळ... ठाकरेंच्या गैरव्यवस्थापनाने ‘बेस्ट’ कोलमडली!
परिवाराची सत्ता आणि मुंबईच्या विकासावर पडलेला ब्रेक—आरे मेट्रो कारशेड वाद आणि रखडलेला मेट्रो-३ प्रकल्प!
मुंबई STP प्रकल्प : २० वर्षांचा विलंब, २६ हजार कोटी रुपयांचा खर्च आणि बीएमसीतील निर्णयशून्यतेची किंमत!
हम दो, हमारे दो... परफेक्ट फॅमिली!
टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टूम…
अस्मितेच्या शिळ्या खिचडीचे ‘कॉम्बो मिल…’
बीएमसीच्या अग्निशमन दलातील घोटाळे आणि घराणेशाहीच्या सत्तेखाली धोक्यात आलेली शहराची सुरक्षा!
बीएमसीतील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : घराणेशाहीच्या सत्तेखाली वाढलेली घोटाळ्यांची संस्कृती...
मिठीच्या गाळात अडकलेल्या अभिनेता डिनो मोरियाचे मातोश्री कनेक्शन काय?
बीएमसीच्या आडून परिवारवादाची ‘खिचडी’ कुठे शिजली?
अस्तित्वाची लढाई… तुझ्या की माझ्या?
मुंबईची ‘पिगी बँक’ आणि दोन भावांची ‘विमा पॉलिसी’!
बीएमसीतील १२ हजार कोटींच्या कामांवर कॅगचा घाव : एका परिवाराच्या छत्रछायेखाली फोफावलेला गैरकारभार उघड!
बीएमसीचा कोविड डेड बॉडी बॅग घोटाळा : महामारीत मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणाच्या ताटात?
कोहिनूर मिल : मराठी मजुरांच्या स्मशानभूमीवर उभं राहिलेलं राजकीय–रिअल इस्टेट साम्राज्य!
बीएमसीतील जम्बो कोविड सेंटर घोटाळा : परिवारवादाच्या छत्राखाली महामारीतही तिजोरीवर डल्ला!
मुंबईतील मराठी शाळा  बंद पडण्याला जबाबदार कोण?
नात्यापेक्षा नोटांची ओढ भारी!
आपण दोघे भाऊ सत्तेवर बसून खाऊ!
पेंग्विनसाठी रडणं म्हणजेच पर्यावरण-प्रेम!
CASHICOL — भ्रष्टाचाराचा ब्रॅण्ड!
Scammers चा फ्रेम गेम!
शहर मुंबईकरांचे… सत्ता घराण्यांची, दिशा सोयीची!
मनमानी घर घर की...
BMC चले हम!
महापालिकेचा भ्रष्ट दरबार!
English Hindi Marathi
← Back to Home

अस्मितेच्या शिळ्या खिचडीचे ‘कॉम्बो मिल…’

Articles

दुपारची वेळ... हॉटेलमध्ये निरनिराळ्या पदार्थांचे सुवास दरवळत होते. गिऱ्हाईकांची गर्दी ओसंडून वाहत होती. तेवढ्यात एका न्यूज चॅनेलची 'ओव्हर-एक्सायटेड' अँकर हातात मोठा बूम आणि मागे धापा टाकणारा कॅमेरामन घेऊन हॉटेलमध्ये शिरली. अँकर- मुंबईचा खवैय्या फार चोखंदळ असतो. त्याला वाफाळलेली मिसळ कधी खावी, कोणाकडची खावी आणि झणझणीत वडापाव कुठल्या एरियात कोणाकडे चांगला मिळतो, याची इत्यंभूत माहिती असते. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे ‘ठाकरे ब्रदर्स’ एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत, ते पाहून वाटतंय की मुंबईच्या राजकीय किचनमध्ये एक विचित्र 'फ्युजन डिश' तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. ज्या दोन भावांनी वर्षानुवर्षे एकमेकांच्या रेसिपीला ‘अळणी’ म्हटलं, तेच आता एकत्र येऊन मुंबईकरांना ‘झणझणीत मराठी ताट’ वाढायला निघालेत. पण या डिशचा वास मात्र काहीसा ‘स्वार्थी’ येतोय. "नमस्कार! मुंबई महापालिकेचा बिगुल वाजलाय आणि ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आता घराघरातून थेट हॉटेलच्या टेबलपर्यंत पोहोचली आहे. चला तर मग, जाणून घेऊया काय वाटतंय मुंबईच्या खवैय्यांना या 'महारोजगार' युतीबद्दल!" अँकर धावत एका कोपऱ्यात बसलेल्या एका वयस्कर काकांकडे गेली, जे शांतपणे पिठलं-भाकरी ओरपत होते. अँकर: "काका, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत! जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतोय. तुम्हाला काय वाटतं, या युतीमुळे मुंबईचा चेहरा बदलेल?" काका: (घास गिळत मिश्किलपणे) "बघ पोरी, हे हॉटेलमध्ये कसं असतं, मालक बदलला तरी चव तीच राहिली पाहिजे… इथे तर जुन्या मालकानेच मुंबईची चव पार बिघडवलीय… त्यात हॉटेल चालेनासं झालंय म्हणून त्याने अजून एक नवीन पार्टनर घेतलाय… म्हणजे काय तर फक्त दोन जुन्या शेफनी एकत्र येऊन नवीन 'फ्युजन' बनवायचा घाट घातलाय. गेल्या ३० वर्षांपासून याच 'खानावळी'ची चावी यांच्याकडे होती, तेव्हा मुंबईकरांना खड्ड्यांची चटणी आणि गढूळ पाण्याचा रस्साच मिळत होता ना? अँकर थोडी ओशाळली आणि लगेच दुसऱ्या टेबलकडे वळली- तिथे एक जाडसर मस्तमौला गृहस्थ मिसळीवर ताव मारत होते… अँकर त्यांच्याकडे जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेऊ लागली- दादा तुम्हाला या दोन भावांच्या युतीबद्दल काय वाटतंय… दादा- हे दोन्ही ब्रँड्स आता ‘ओव्हररेटेड’ वाटू लागले आहेत. एकेकाळी ज्यांच्या भाषणाची फोडणी ऐकायला मुंबईकर गर्दी करायचे, त्यांच्याकडे आता तोच जुना मेनू उरला आहे. एका बाजूला सत्तेचा मलिदा संपलेला ‘मोठा मालक’ आणि दुसऱ्या बाजूला नवीन गिऱ्हाईक न मिळाल्यामुळे दुकान पडलेलं ‘धाकटा मालक’. हे दोन्ही शेफ जेव्हा एकत्र येण्याची भाषा करतात, तेव्हा ते मुंबईचा उद्धार करायला नाही, तर आपली जुनी ‘जहागीरदारी’ असलेली खानावळ वाचवायला एकत्र येत आहेत. ग्राहकाला (मुंबईकराला) आता जुन्या चवीचा कंटाळा आलाय, त्याला ‘डेव्हलपमेंट’चा फ्रेश तडका हवाय. अँकर तिसऱ्या टेबलवर एका मध्यमवर्गीय नोकरदार महिलेकडे वळली… आणि विचारलं तुम्हाला काय वाटतं… नोकरदार महिला- मुंबई महानगरपालिका म्हणजे या दोन्ही भावांसाठी जणू काही ‘आशियांतील सर्वात मोठं अन्नछत्र’ आहे. गेल्या कित्येक दशकांपासून या महापालिकेची ‘कन्फेक्शनरी’ एकाच कुटुंबाच्या ताब्यात होती. मलिदा कोणाला द्यायचा आणि बिर्याणी कोणामध्ये वाटायची, याचे सर्व अधिकार एकाच किचनमध्ये सुरक्षित होते. आज जेव्हा महापालिकेच्या तिजोरीची किल्ली हरवण्याची भीती वाटू लागली, तेव्हा भावांना भावांच्या प्रेमाचा उमाळा आला. हा विकास नाही, तर ही ‘हॉटेलचा गल्ला’ पुन्हा एकदा आपल्याच कपाटात कसा येईल, यासाठी रचलेलं हे राजकीय ‘फ्युजन’ आहे. अँकरला एकही पॉझिटीव्ह प्रतिक्रिया सापडेना म्हणून ती एका आजोबांकडे आली. तिला वाटलं हे एकदम निष्ठावंत शिवसैनिक असतील. म्हणून तिने त्यांना मत विचारलं- आजोबा- राजकारणाच्या या हॉटेलमध्ये जेव्हा जेव्हा मंदी येते, तेव्हा तेव्हा ‘मराठी अस्मितेचा’ शिळा मसाला बाहेर काढला जातो. ज्या भावांनी मुंबईच्या रस्त्यांचे खड्डे आणि पावसाचं पाणी यावर कधीच चविष्ट उपाय दिले नाहीत, ते आता पुन्हा एकदा ‘मराठी माणसाला जागं करण्याचं’ चूर्ण विकू लागले आहेत. पण मुंबईकर खवैय्या आता शहाणा झाला आहे. त्याला ठाऊक आहे की, ही युती म्हणजे प्रेमाची ‘मिठाई’ नसून केवळ सत्तेची ‘भजी’ तळण्यासाठी पेटवलेली चूल आहे. त्यांचं मत ऐकून चक्रावलेली अँकर एका उच्चशिक्षित कुटुंबीय बसलेल्या टेबलकडे वळली आणि तिने त्यांच्यासमोर बुम माईक धरून त्यांचं मत विचारलं…. महिला- हे मर्जर म्हणजे ‘कॉर्पोरेट कॅटरिंग’ विरुद्ध ‘फॅमिली डायनिंग’ एकीकडे मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी नवे प्रकल्प आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा तडका दिला जातोय, तर दुसरीकडे ठाकरे बंधू अजूनही ‘आमची जुनी चवच कशी भारी’ या भ्रमात आहेत. हे मर्जर म्हणजे दोन बुडत्या रेस्टॉरंट्सनी एकत्र येऊन काढलेली नवी ‘फ्रँचायझी’ वाटत आहे. पण या फ्रँचायझीमध्ये ना नवीन व्हिजन आहे, ना नवीन डिश. आहे तोच जुना तक्रारीचा पाढा आणि ‘आम्हीच मुंबईचे मालक’ हा अहंकार. अखेर अँकरने आपला मोर्चा तात्यांकडे वळवला. तात्या म्हणजे हॉटेलचे मालक- अँकर: "तात्या, तुम्ही इतकी वर्ष हॉटेल चालवताय. या युतीमुळे राजकारणातली त्यांची 'मंदी' संपेल का?" तात्या: (चष्मा नीट करत) "पोरी, जेव्हा हॉटेलचा धंदा बसतो ना, तेव्हा मालक 'बाय वन गेट वन फ्री'ची स्कीम काढतो. ही युती म्हणजे तशीच एक स्कीम आहे. एका भावाचं 'इंजिन' वाफ सोडतंय आणि दुसऱ्याला त्याचा 'धनुष्यबाण' सांभाळता आला नाही…. , म्हणून आता दोघं एकत्र येऊन 'कॉम्बो मील' विकायला निघालेत. पण गिऱ्हाईक आता हुशार झालंय. त्याला माहिती आहे की, हे दोघं एकत्र आलेत ते मुंबईच्या 'किचन'मध्ये सुधारणा करायला नाही, तर स्वतःच्या गल्ल्यात भर टाकायला!" पण मुंबईकराने एक लक्षात घ्यायला पाहिजे- शेवटी प्रश्न येतो तो बिलाचा! या दोन्ही भावांच्या युतीचं राजकीय बिल पुन्हा एकदा मुंबईकरांनाच भरावं लागणार आहे का? BMC is not a family business #notafamilybusiness

अस्मितेच्या शिळ्या खिचडीचे ‘कॉम्बो मिल…’

Continue watching

बीएमसी इलेक्शन : द ठाकरे 'कोलॅब' (Collab) आणि जेन-झीचा 'एक्झिट पोल'!
बीएमसी इलेक्शन : द ठाकरे 'कोलॅब' (Collab) आणि जेन-झीचा 'एक्झिट पोल'!
पत्रा चाळ - 'कौटुंबिक व्यवसायाचा' सुवर्णकाळ!
गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याचा मलिदा कुणी लाटला?
गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याचा मलिदा कुणी लाटला?
पर्यावरणाचा मुखवटा, बीएमसीतील निर्णयांचा गोंधळ... ठाकरेंच्या गैरव्यवस्थापनाने ‘बेस्ट’ कोलमडली!
पर्यावरणाचा मुखवटा, बीएमसीतील निर्णयांचा गोंधळ... ठाकरेंच्या गैरव्यवस्थापनाने ‘बेस्ट’ कोलमडली!
कोहिनूरचा 'काळा' बाजार : कामगारांना केलं उद्ध्वस्त, अन् 'परिवारा'ने केला माल फस्त!
मुंबईकरांच्या नशिबी 'सांडपाणी' आणि नेत्यांच्या खिशात 'लोणी'! २ दशकांचा मास्टरक्लास!
मुंबई कोणाची जहागीर...? ठरवा आता, कारण वेळ आली आहे हिशेबाची!
मुंबईकरांचा कापला जातोय गळा... कारण, "डोंगराला आग लागली... पळा पळा...!"
'खाली मुंडी पाताळ धुंडी' - मुंबई झाली कचरा कुंडी!
परिवाराची सत्ता आणि मुंबईच्या विकासावर पडलेला ब्रेक—आरे मेट्रो कारशेड वाद आणि रखडलेला मेट्रो-३ प्रकल्प!
परिवाराची सत्ता आणि मुंबईच्या विकासावर पडलेला ब्रेक—आरे मेट्रो कारशेड वाद आणि रखडलेला मेट्रो-३ प्रकल्प!
संधीचे सोने की संधीचे घोटाळे : झाली मुंबई घोटाळ्यांची!
मुंबई STP प्रकल्प : २० वर्षांचा विलंब, २६ हजार कोटी रुपयांचा खर्च आणि बीएमसीतील निर्णयशून्यतेची किंमत!
मुंबई STP प्रकल्प : २० वर्षांचा विलंब, २६ हजार कोटी रुपयांचा खर्च आणि बीएमसीतील निर्णयशून्यतेची किंमत!
"बाळ अन् बाळाचे पाय अजूनही पाळण्यात... पण पेंग्विनचे पाय मात्र वातानुकूलित यंत्रात; अन् मुंबईकर मात्र खड्ड्यात...!"
"बाबा...!, पेंग्विन..ढिंचॅक..ढिंचॅक... अरेरे...! ईडी आली वेशीपाशी...!"
कामचलाऊ महाविकास आघाडी - फक्त कामबिघाडी - और बोलती है 'चलती का नाम गाडी!'
हम दो, हमारे दो... परफेक्ट फॅमिली!
हम दो, हमारे दो... परफेक्ट फॅमिली!
कागदावरची 'स्वच्छ मिठी' आणि मुंबईकरांची 'पाण्यात सुट्टी!' ६५ कोटींचा जबरदस्त 'गाळ' कार्यक्रम!
टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टूम…
टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टूम…
मराठीच्या गप्पा आणि उर्दूमध्ये 'सलाम...!' ठाकरेंचा दुटप्पीपणा!
बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील १२ हजार कोटींचा घोटाळा आणि कोविड काळातील ३,५०० कोटींचा हिशेब गायब; मुंबईकरांच्या पैशावर डल्ला? 'कॅग'च्या अहवालाने उडवली खळबळ!
कोविड जंबो सेंटरचा 'जंबो' घोटाळा? मुंबईकरांच्या जिवाशी खेळ आणि पैशांची लूट!
बीएमसीच्या अग्निशमन दलातील घोटाळे आणि घराणेशाहीच्या सत्तेखाली धोक्यात आलेली शहराची सुरक्षा!
बीएमसीच्या अग्निशमन दलातील घोटाळे आणि घराणेशाहीच्या सत्तेखाली धोक्यात आलेली शहराची सुरक्षा!
बीएमसीतील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : घराणेशाहीच्या सत्तेखाली वाढलेली घोटाळ्यांची संस्कृती...
बीएमसीतील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : घराणेशाहीच्या सत्तेखाली वाढलेली घोटाळ्यांची संस्कृती...
मिठीच्या गाळात अडकलेल्या अभिनेता डिनो मोरियाचे मातोश्री कनेक्शन काय?
मिठीच्या गाळात अडकलेल्या अभिनेता डिनो मोरियाचे मातोश्री कनेक्शन काय?
बीएमसीच्या आडून परिवारवादाची ‘खिचडी’ कुठे शिजली?
बीएमसीच्या आडून परिवारवादाची ‘खिचडी’ कुठे शिजली?
अस्तित्वाची लढाई… तुझ्या की माझ्या?
अस्तित्वाची लढाई… तुझ्या की माझ्या?
मुंबईची ‘पिगी बँक’ आणि दोन भावांची ‘विमा पॉलिसी’!
मुंबईची ‘पिगी बँक’ आणि दोन भावांची ‘विमा पॉलिसी’!
बीएमसीतील १२ हजार कोटींच्या कामांवर कॅगचा घाव : एका परिवाराच्या छत्रछायेखाली फोफावलेला गैरकारभार उघड!
बीएमसीतील १२ हजार कोटींच्या कामांवर कॅगचा घाव : एका परिवाराच्या छत्रछायेखाली फोफावलेला गैरकारभार उघड!
बीएमसीचा कोविड डेड बॉडी बॅग घोटाळा : महामारीत मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणाच्या ताटात?
बीएमसीचा कोविड डेड बॉडी बॅग घोटाळा : महामारीत मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणाच्या ताटात?
कोहिनूर मिल : मराठी मजुरांच्या स्मशानभूमीवर उभं राहिलेलं राजकीय–रिअल इस्टेट साम्राज्य!
कोहिनूर मिल : मराठी मजुरांच्या स्मशानभूमीवर उभं राहिलेलं राजकीय–रिअल इस्टेट साम्राज्य!
बीएमसीतील जम्बो कोविड सेंटर घोटाळा : परिवारवादाच्या छत्राखाली महामारीतही तिजोरीवर डल्ला!
बीएमसीतील जम्बो कोविड सेंटर घोटाळा : परिवारवादाच्या छत्राखाली महामारीतही तिजोरीवर डल्ला!
मुंबईतील मराठी शाळा  बंद पडण्याला जबाबदार कोण?
मुंबईतील मराठी शाळा बंद पडण्याला जबाबदार कोण?
बीएमसी: विकासाचे साधन की नियंत्रणाचे माध्यम...?
आवाज उठतो… वारसा अडखळतो...
खिचडीच्या नावाखाली फक्त डाळ शिजली!
लंडन, पॅरिसनंतर आता मुंबई 'रडार'वर...? – जागतिक 'टेकओव्हर'च्या संकटाकडे दुर्लक्ष करू नका!
हुतात्म्यांचा अपमान की मतांचे राजकारण? काँग्रेसचा खरा चेहरा उघड!
मुंबईचे रक्षण की लांगूलचालन? – मुंबईला 'मिनी-पाकिस्तान' होण्यापासून वाचवा!
नात्यापेक्षा नोटांची ओढ भारी!
नात्यापेक्षा नोटांची ओढ भारी!
आपण दोघे भाऊ सत्तेवर बसून खाऊ!
आपण दोघे भाऊ सत्तेवर बसून खाऊ!
पेंग्विनसाठी रडणं म्हणजेच पर्यावरण-प्रेम!
पेंग्विनसाठी रडणं म्हणजेच पर्यावरण-प्रेम!
CASHICOL — भ्रष्टाचाराचा ब्रॅण्ड!
CASHICOL — भ्रष्टाचाराचा ब्रॅण्ड!
Scammers चा फ्रेम गेम!
Scammers चा फ्रेम गेम!
शहर मुंबईकरांचे… सत्ता घराण्यांची, दिशा सोयीची!
शहर मुंबईकरांचे… सत्ता घराण्यांची, दिशा सोयीची!
मनमानी घर घर की...
मनमानी घर घर की...
BMC चले हम!
BMC चले हम!
महापालिकेचा भ्रष्ट दरबार!
महापालिकेचा भ्रष्ट दरबार!
मुंबईचे गुन्हेगार...!