Home Articles Comics Videos
बीएमसी इलेक्शन : द ठाकरे 'कोलॅब' (Collab) आणि जेन-झीचा 'एक्झिट पोल'!
गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याचा मलिदा कुणी लाटला?
पर्यावरणाचा मुखवटा, बीएमसीतील निर्णयांचा गोंधळ... ठाकरेंच्या गैरव्यवस्थापनाने ‘बेस्ट’ कोलमडली!
परिवाराची सत्ता आणि मुंबईच्या विकासावर पडलेला ब्रेक—आरे मेट्रो कारशेड वाद आणि रखडलेला मेट्रो-३ प्रकल्प!
मुंबई STP प्रकल्प : २० वर्षांचा विलंब, २६ हजार कोटी रुपयांचा खर्च आणि बीएमसीतील निर्णयशून्यतेची किंमत!
हम दो, हमारे दो... परफेक्ट फॅमिली!
टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टूम…
अस्मितेच्या शिळ्या खिचडीचे ‘कॉम्बो मिल…’
बीएमसीच्या अग्निशमन दलातील घोटाळे आणि घराणेशाहीच्या सत्तेखाली धोक्यात आलेली शहराची सुरक्षा!
बीएमसीतील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : घराणेशाहीच्या सत्तेखाली वाढलेली घोटाळ्यांची संस्कृती...
मिठीच्या गाळात अडकलेल्या अभिनेता डिनो मोरियाचे मातोश्री कनेक्शन काय?
बीएमसीच्या आडून परिवारवादाची ‘खिचडी’ कुठे शिजली?
अस्तित्वाची लढाई… तुझ्या की माझ्या?
मुंबईची ‘पिगी बँक’ आणि दोन भावांची ‘विमा पॉलिसी’!
बीएमसीतील १२ हजार कोटींच्या कामांवर कॅगचा घाव : एका परिवाराच्या छत्रछायेखाली फोफावलेला गैरकारभार उघड!
बीएमसीचा कोविड डेड बॉडी बॅग घोटाळा : महामारीत मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणाच्या ताटात?
कोहिनूर मिल : मराठी मजुरांच्या स्मशानभूमीवर उभं राहिलेलं राजकीय–रिअल इस्टेट साम्राज्य!
बीएमसीतील जम्बो कोविड सेंटर घोटाळा : परिवारवादाच्या छत्राखाली महामारीतही तिजोरीवर डल्ला!
मुंबईतील मराठी शाळा  बंद पडण्याला जबाबदार कोण?
नात्यापेक्षा नोटांची ओढ भारी!
आपण दोघे भाऊ सत्तेवर बसून खाऊ!
पेंग्विनसाठी रडणं म्हणजेच पर्यावरण-प्रेम!
CASHICOL — भ्रष्टाचाराचा ब्रॅण्ड!
Scammers चा फ्रेम गेम!
शहर मुंबईकरांचे… सत्ता घराण्यांची, दिशा सोयीची!
मनमानी घर घर की...
BMC चले हम!
महापालिकेचा भ्रष्ट दरबार!
English Hindi Marathi
← Back to Home

बीएमसीतील जम्बो कोविड सेंटर घोटाळा : परिवारवादाच्या छत्राखाली महामारीतही तिजोरीवर डल्ला!

Articles

"मुंबई महानगरपालिकेवर म्हणजे (BMC) वर दोन दशकांपेक्षा अधिक काळापर्यंत ठाकरे कुटुंबाची सत्ता होती. याच सत्ताकेंद्रित व्यवस्थेच्या छत्राखाली बीएमसीमध्ये घोटाळ्यांची एकामागून एक प्रकरणे उघडकीस येत असल्याचे चित्र आता तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर येत आहे. त्यातीलच एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरण म्हणजे जम्बो कोविड सेंटर घोटाळा. कोविड काळात मुंबईतील रुग्ण ICU बेडसाठी, ऑक्सिजनसाठी तडफडत असताना, बीएमसीच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार म्हणून समोर आलेले नाव म्हणजे सुजित पाटकर — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांचा निकटवर्तीय. त्यामुळे हा प्रकार केवळ प्रशासकीय हलगर्जीपणाचा नसून, घराणेशाहीच्या जवळच्या मंडळींना दिलेल्या कंत्राटांमुळे बीएमसीची कशी ‘ATM’ बनवली गेली, याचा जणू पुरावाचं आहे. महामारी आणि जम्बो कोविड सेंटरची गरज २०२० मध्ये कोविड-१९ महामारीने मुंबईला अक्षरशः गुडघ्यावर आणले होते. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नव्हते. या पार्श्वभूमीवर बीएमसीने दहिसर आणि वरळी येथे मोठ्या क्षमतेची जम्बो कोविड सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला. या सेंटर्सकडून हजारो रुग्णांना उपचार मिळतील, अशी अपेक्षा होती.मात्र या सेंटर्सचे व्यवस्थापन बीएमसीने थेट स्वतः न करता Lifeline Hospital Management Services या खासगी संस्थेला देण्यात आले. हा काळ महाविकास आघाडी सरकारचा होता. आणि तेव्हा मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे. आणि बीएमसीवर शिवसेनेचे राजकीय वर्चस्व होते. कंत्राट वाटपावर प्रश्नचिन्ह तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, Lifeline Hospital Management Services ला कंत्राट देताना आवश्यक त्या पात्रतेची, मनुष्यबळाची आणि अनुभवाची सखोल तपासणी झाली का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर जे चित्र समोर आले, ते कंत्राटाच्या अटींना छेद देणारे होते. विशेष म्हणजे या कंपनीचा प्रमुख सुजित पाटकर हा सत्ताधारी पक्षातील प्रभावी नेते असलेले संजय राऊत यांचा निकटवर्तीय असल्याने, कंत्राट मिळण्यात राजकीय हस्तक्षेप झाला का, याचाही तपास सुरू आहे. बनावट नोंदींचा धक्कादायक पर्दाफाश अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या. जम्बो कोविड सेंटरमध्ये आवश्यक त्या प्रमाणात डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय कर्मचारी प्रत्यक्षात कार्यरत नव्हते मात्र कागदावर पूर्ण मनुष्यबळ दाखवण्यात आलं. एवढचं नाही तर, बनावट हजेरी पत्रके तयार करण्यात आली. ‘घोस्ट एम्प्लॉईज’च्या नावावर वेतन आणि सेवा शुल्क दाखवण्यात आलं. तपासात असंही समोर आलं की, वरळी जम्बो कोविड सेंटरसाठी कर्मचाऱ्यांची कोणतीही माहिती सादर न करता देखील बीएमसीकडून बिले मंजूर करण्यात आली. म्हणजेच प्रत्यक्ष तपासणीशिवाय, फक्त कागदोपत्री नोंदींवर विश्वास ठेवून कोट्यवधींची देयके अदा करण्यात आली. ३२ कोटींचा हिशोब आणि निधी वळवणूक ED च्या तपासानुसार, सप्टेंबर २०२० ते जून २०२२ या कालावधीत Lifeline Hospital Management Services ला सुमारे ₹३२.४४ कोटी इतकी रक्कम बीएमसीकडून मिळाली. ही रक्कम जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापनासाठी देण्यात आली होती. मात्र तपासात हा निधी—वैयक्तिक मालमत्ता खरेदी , कर्जफेड , रिअल इस्टेट व्यवहार यासाठी वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजेच कोविड रुग्णांसाठी आलेला पैसा उपचारांऐवजी खासगी फायद्यासाठी वापरला गेला, असा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. बीएमसीतील जबाबदारी कोणाची? या घोटाळ्यात फक्त खासगी कंपनीच नव्हे, तर बीएमसीतील काही अधिकारीही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. बनावट कागदपत्रे, खोटी हजेरी आणि अपूर्ण सेवा असूनही बिले मंजूर कशी झाली, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात—दहिसर जम्बो कोविड सेंटरचे तत्कालीन डीन डॉ. किशोर बिसुरे यांना जुलै २०२३ मध्ये अटक झाली फेब्रुवारी २०२५ मध्ये त्यांना जामीन मंजूर झाला .बीएमसीतील काही अधिकाऱ्यांवर बनावट नोंदींना मंजुरी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सुरुवात मुंबई पोलिसांकडे दाखल झालेल्या एफआयआरमधून झाली, त्यानंतर ED ने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करत तपास अधिक तीव्र केला. जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यामुळे बीएमसीतील सत्ताकेंद्रित व्यवस्थेवर जोरदार आरोप होत आहेत. हा घोटाळा म्हणजे ठाकरेंच्या घराणेशाहीच्या काळात बीएमसी कशी ‘ATM’ बनली याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. कोविड काळात मुंबईकरांनी भीषण संकट अनुभवले. अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. अशा काळात आरोग्य व्यवस्थेचा जर गैरवापर झाला असेल, तर तो केवळ आर्थिक घोटाळा नसून मुंबईकरांचा विश्वासघात आहे. जम्बो कोविड सेंटर घोटाळा सध्या न्यायालयीन प्रक्रियेत आहे आणि अंतिम निर्णय न्यायालय देईल. मात्र या प्रकरणामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे— बीएमसीसारखी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका जर घराणेशाही, राजकीय जवळीक आणि कंत्राटी संस्कृतीच्या विळख्यात अडकली, तर त्याची किंमत थेट सामान्य मुंबईकरांना मोजावी लागते. येणाऱ्या बीएमसी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा घोटाळा केवळ एक बातमी न राहता, मुंबईच्या प्रशासनाच्या भवितव्याचा प्रश्न बनला आहे. या घोटाळ्याने परिवारवादी भ्रष्ट मानसिकता उघड झालीय.पण मुंबईकर आता हे सहन करणार नाही... कारण लक्षात ठेवा, मुंबई ही एका परिवाराची जहागीर नाही.... BMC is not a family business #notafamilybusiness

बीएमसीतील जम्बो कोविड सेंटर घोटाळा : परिवारवादाच्या छत्राखाली महामारीतही तिजोरीवर डल्ला!

Continue watching

बीएमसी इलेक्शन : द ठाकरे 'कोलॅब' (Collab) आणि जेन-झीचा 'एक्झिट पोल'!
बीएमसी इलेक्शन : द ठाकरे 'कोलॅब' (Collab) आणि जेन-झीचा 'एक्झिट पोल'!
पत्रा चाळ - 'कौटुंबिक व्यवसायाचा' सुवर्णकाळ!
गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याचा मलिदा कुणी लाटला?
गोरेगावच्या पत्रा चाळ घोटाळ्याचा मलिदा कुणी लाटला?
पर्यावरणाचा मुखवटा, बीएमसीतील निर्णयांचा गोंधळ... ठाकरेंच्या गैरव्यवस्थापनाने ‘बेस्ट’ कोलमडली!
पर्यावरणाचा मुखवटा, बीएमसीतील निर्णयांचा गोंधळ... ठाकरेंच्या गैरव्यवस्थापनाने ‘बेस्ट’ कोलमडली!
कोहिनूरचा 'काळा' बाजार : कामगारांना केलं उद्ध्वस्त, अन् 'परिवारा'ने केला माल फस्त!
मुंबईकरांच्या नशिबी 'सांडपाणी' आणि नेत्यांच्या खिशात 'लोणी'! २ दशकांचा मास्टरक्लास!
मुंबई कोणाची जहागीर...? ठरवा आता, कारण वेळ आली आहे हिशेबाची!
मुंबईकरांचा कापला जातोय गळा... कारण, "डोंगराला आग लागली... पळा पळा...!"
'खाली मुंडी पाताळ धुंडी' - मुंबई झाली कचरा कुंडी!
परिवाराची सत्ता आणि मुंबईच्या विकासावर पडलेला ब्रेक—आरे मेट्रो कारशेड वाद आणि रखडलेला मेट्रो-३ प्रकल्प!
परिवाराची सत्ता आणि मुंबईच्या विकासावर पडलेला ब्रेक—आरे मेट्रो कारशेड वाद आणि रखडलेला मेट्रो-३ प्रकल्प!
संधीचे सोने की संधीचे घोटाळे : झाली मुंबई घोटाळ्यांची!
मुंबई STP प्रकल्प : २० वर्षांचा विलंब, २६ हजार कोटी रुपयांचा खर्च आणि बीएमसीतील निर्णयशून्यतेची किंमत!
मुंबई STP प्रकल्प : २० वर्षांचा विलंब, २६ हजार कोटी रुपयांचा खर्च आणि बीएमसीतील निर्णयशून्यतेची किंमत!
"बाळ अन् बाळाचे पाय अजूनही पाळण्यात... पण पेंग्विनचे पाय मात्र वातानुकूलित यंत्रात; अन् मुंबईकर मात्र खड्ड्यात...!"
"बाबा...!, पेंग्विन..ढिंचॅक..ढिंचॅक... अरेरे...! ईडी आली वेशीपाशी...!"
कामचलाऊ महाविकास आघाडी - फक्त कामबिघाडी - और बोलती है 'चलती का नाम गाडी!'
हम दो, हमारे दो... परफेक्ट फॅमिली!
हम दो, हमारे दो... परफेक्ट फॅमिली!
कागदावरची 'स्वच्छ मिठी' आणि मुंबईकरांची 'पाण्यात सुट्टी!' ६५ कोटींचा जबरदस्त 'गाळ' कार्यक्रम!
टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टूम…
टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टांग टिंग टिंगाक… टूम…
अस्मितेच्या शिळ्या खिचडीचे ‘कॉम्बो मिल…’
अस्मितेच्या शिळ्या खिचडीचे ‘कॉम्बो मिल…’
मराठीच्या गप्पा आणि उर्दूमध्ये 'सलाम...!' ठाकरेंचा दुटप्पीपणा!
बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील १२ हजार कोटींचा घोटाळा आणि कोविड काळातील ३,५०० कोटींचा हिशेब गायब; मुंबईकरांच्या पैशावर डल्ला? 'कॅग'च्या अहवालाने उडवली खळबळ!
कोविड जंबो सेंटरचा 'जंबो' घोटाळा? मुंबईकरांच्या जिवाशी खेळ आणि पैशांची लूट!
बीएमसीच्या अग्निशमन दलातील घोटाळे आणि घराणेशाहीच्या सत्तेखाली धोक्यात आलेली शहराची सुरक्षा!
बीएमसीच्या अग्निशमन दलातील घोटाळे आणि घराणेशाहीच्या सत्तेखाली धोक्यात आलेली शहराची सुरक्षा!
बीएमसीतील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : घराणेशाहीच्या सत्तेखाली वाढलेली घोटाळ्यांची संस्कृती...
बीएमसीतील घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : घराणेशाहीच्या सत्तेखाली वाढलेली घोटाळ्यांची संस्कृती...
मिठीच्या गाळात अडकलेल्या अभिनेता डिनो मोरियाचे मातोश्री कनेक्शन काय?
मिठीच्या गाळात अडकलेल्या अभिनेता डिनो मोरियाचे मातोश्री कनेक्शन काय?
बीएमसीच्या आडून परिवारवादाची ‘खिचडी’ कुठे शिजली?
बीएमसीच्या आडून परिवारवादाची ‘खिचडी’ कुठे शिजली?
अस्तित्वाची लढाई… तुझ्या की माझ्या?
अस्तित्वाची लढाई… तुझ्या की माझ्या?
मुंबईची ‘पिगी बँक’ आणि दोन भावांची ‘विमा पॉलिसी’!
मुंबईची ‘पिगी बँक’ आणि दोन भावांची ‘विमा पॉलिसी’!
बीएमसीतील १२ हजार कोटींच्या कामांवर कॅगचा घाव : एका परिवाराच्या छत्रछायेखाली फोफावलेला गैरकारभार उघड!
बीएमसीतील १२ हजार कोटींच्या कामांवर कॅगचा घाव : एका परिवाराच्या छत्रछायेखाली फोफावलेला गैरकारभार उघड!
बीएमसीचा कोविड डेड बॉडी बॅग घोटाळा : महामारीत मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणाच्या ताटात?
बीएमसीचा कोविड डेड बॉडी बॅग घोटाळा : महामारीत मृतांच्या टाळूवरचे लोणी कोणाच्या ताटात?
कोहिनूर मिल : मराठी मजुरांच्या स्मशानभूमीवर उभं राहिलेलं राजकीय–रिअल इस्टेट साम्राज्य!
कोहिनूर मिल : मराठी मजुरांच्या स्मशानभूमीवर उभं राहिलेलं राजकीय–रिअल इस्टेट साम्राज्य!
मुंबईतील मराठी शाळा  बंद पडण्याला जबाबदार कोण?
मुंबईतील मराठी शाळा बंद पडण्याला जबाबदार कोण?
बीएमसी: विकासाचे साधन की नियंत्रणाचे माध्यम...?
आवाज उठतो… वारसा अडखळतो...
खिचडीच्या नावाखाली फक्त डाळ शिजली!
लंडन, पॅरिसनंतर आता मुंबई 'रडार'वर...? – जागतिक 'टेकओव्हर'च्या संकटाकडे दुर्लक्ष करू नका!
हुतात्म्यांचा अपमान की मतांचे राजकारण? काँग्रेसचा खरा चेहरा उघड!
मुंबईचे रक्षण की लांगूलचालन? – मुंबईला 'मिनी-पाकिस्तान' होण्यापासून वाचवा!
नात्यापेक्षा नोटांची ओढ भारी!
नात्यापेक्षा नोटांची ओढ भारी!
आपण दोघे भाऊ सत्तेवर बसून खाऊ!
आपण दोघे भाऊ सत्तेवर बसून खाऊ!
पेंग्विनसाठी रडणं म्हणजेच पर्यावरण-प्रेम!
पेंग्विनसाठी रडणं म्हणजेच पर्यावरण-प्रेम!
CASHICOL — भ्रष्टाचाराचा ब्रॅण्ड!
CASHICOL — भ्रष्टाचाराचा ब्रॅण्ड!
Scammers चा फ्रेम गेम!
Scammers चा फ्रेम गेम!
शहर मुंबईकरांचे… सत्ता घराण्यांची, दिशा सोयीची!
शहर मुंबईकरांचे… सत्ता घराण्यांची, दिशा सोयीची!
मनमानी घर घर की...
मनमानी घर घर की...
BMC चले हम!
BMC चले हम!
महापालिकेचा भ्रष्ट दरबार!
महापालिकेचा भ्रष्ट दरबार!
मुंबईचे गुन्हेगार...!