संधीचे सोने की संधीचे घोटाळे : झाली मुंबई घोटाळ्यांची!
Videos"जिवाच्या आकांताने जेव्हा फक्त मुंबईच नाही तर अख्खे जग Covid काळात त्रासून गेले होते, तेव्हा मुंबईमध्ये काही काही 'कार्यक्षम' लोक मात्र आपले नशीब उजळवत होते. संकटात संधी शोधण्याचे कौशल्य आपण सर्वांनी ऐकलेच असेल, पण मुंबई महानगरपालिकेने तर संकटालाही व्यवसायामध्ये कसे ओढता येईल यावर भर दिला. या व्हिडीओमध्ये आपण 'Business Mein Covid' (BMC) मधील अशाच काही '(अ)यशस्वी' व्यवहारांची पोलखोल करणार आहोत: खिचडी घोटाळा (Khichdi Scam): कोविड काळात स्थलांतरित मजुरांना जेवण देण्याच्या नावाखाली नेत्यांच्या जवळच्या लोकांना कोट्यवधींचे कंत्राट दिले गेले. जम्बो कोविड सेंटर घोटाळा (Jumbo Covid Centre Scam): आरोग्य सुविधांच्या नावाखाली बनावट कागदपत्रे वापरून आणि फुगवलेली बिले सादर करून सामान्य मुंबईकरांच्या पैशांची उघड उघड लूट केली गेली. बॉडी बॅग घोटाळा (Body Bag Scam): मृतांच्या बॅग्जमध्येही ज्यांनी नफा शोधला, अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या व्यवहारांची माहिती. रेमडेसिव्हिर आणि औषध घोटाळे: चढ्या दराने औषध खरेदी करून सरकारी तिजोरीवर मारलेला डल्ला. मिठी नदी घोटाळा (Mithi River Scam): केवळ आरोग्यातच नाही तर नदी स्वच्छतेच्या नावाखालीही कोट्यवधींचा गैरव्यवहार करण्यात आला. हा व्हिडीओ म्हणजे त्या काळात झालेल्या 'नफेखोरीचा' आरसा आहे. ईडी (ED) आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) तपासातून समोर आलेली ही धक्कादायक माहिती नक्की पाहा." BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching