आवाज उठतो… वारसा अडखळतो...
Videos"लोकशाही म्हणजे घरचं मंगल कार्यालय नाही, जिथे मुलाला म्हटलं की “चढ आता बोहल्यावर… आणि कर लग्न!” आणि महानगरपालिका म्हणजे घरची जहागीर नाही, जी वडिलांकडून मुलांकडे वसियत म्हणून चालत राहते. “आम्ही दोघे भाऊ, सत्तेवर बसून खाऊ..."" असा डाव सहज साध्य होईल असा गोड गैरसमज बाळगणाऱ्यांनी आता एक गोष्ट लक्षात ठेवावी — ही जनता पूर्वीसारखी गप्प बसणारी राहिलेली नाही. ती आता जागृत झाली आहे, तिला प्रश्न विचारता येतात, आवाज उठवता येतो, आणि गरज पडली तर सत्तेला आरसा दाखवायलाही ती मागे हटत नाही. आता आडनावावर टाळ्या पडणार नाहीत, वंशावर मत मिळणार नाही आणि वारशावर सत्ता चालणार नाही. कारण पुढे एकच प्रश्न उभा राहणार आहे — “तुम्ही कोण आहात?” नाही… “तुम्ही काय केलं आहे?” आणि हाच प्रश्न उद्या नाही, आजच उत्तर मागतोय." BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching