अस्तित्वाची लढाई… तुझ्या की माझ्या?
Articlesसकाळी पावणेसातचा अलार्म झाला… रम्या अर्धवट झोपेत डोळे चोळून बाहेर आला… खळकन चुळ भरली… आणि टूथब्रश वर पेस्ट घेतली… दात घासत घासत सोसायटीच्या कंपाउंडमध्ये येरझारा मारू लागला… ब्रश चालू होता. डोकं बंद होतं. तेवढ्यात त्याचं लक्ष गेलं सोसायटीच्या गेटवर… नवीन सिनेमाचं पोस्टर कोणी चिकटवलंय की काय म्हणून तो आणखी जवळ गेला… बघतो तर काय, एका काळ्या रंगाच्या पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं… “मराठी माणसा जागा हो… ही तुझ्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे.” रम्याचा ब्रश थांबला. “काय?” त्याने डोळे चोळले. अस्तित्व? माझं? कालच तर ऑफिसमधून मेल आला होता- “Please be available on Sunday.” तो म्हणाला माझं रविवारचं अस्तित्व तर त्या इमेलने कालच धोक्यात आणलं होतं… अजून कोणती लढाई मला लढायचीय…? हे बॅनरवर कोण ओरडतंय? अस्तित्वाचं ‘कन्फ्युजन’ रमेशने आजूबाजूला नजर फिरवली. नळाला पाणी नेहमीप्रमाणे कमी दाबात येत होतं. रस्त्यावरचे खड्डे कालच्या ट्रॅफिकने अधिकच 'खोल' आणि 'गंभीर' झाले होते. बेस्टची बस नेहमीप्रमाणेच उशिरा होती. मुंबईत काहीही ‘शेवटचं’ वाटत नव्हतं. या समस्या संपतील अशी सूतराम शक्यता नव्हती… मग ही शेवटची लढाई नेमकी कोणासाठी? रम्या खत्रूड होता… अशा वेळी त्याचं डोकं भन्नाट चालायचं… ज्यावेळी त्याचं डोकं चालायचं त्यावेळी त्याचे डोळे एकदम बारीक व्हायचे… त्याच्या बारीक डोळ्यांसमोर एक दृश्य दिसू लागलं… त्या दृश्यात होते दोन राजवाडे… आण त्या राजवाड्यातून दोन सावल्या बाहेर पडत होत्या… ती ओळ रमेशसाठी नव्हतीच. ती तर दोन राजवाड्यांतून पडणाऱ्या दोन सावल्यांची आर्त हाक होती. 'सपना मर्जर' आणि कौटुंबिक सिंडिकेट एका बाजूला सत्तेतून बाहेर फेकले गेलेले 'मोठे' आणि दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या गणितात हरवलेले 'धाकटे'. हे दोघे जेव्हा एकत्र येण्याचे संकेत देतात, तेव्हा त्याला 'जनहित' म्हणायचं की 'फॅमिली बिझनेस वाचवण्याची धडपड'? कॉर्पोरेट जगात दोन तोट्यात चालणाऱ्या कंपन्या जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्याला 'मर्जर' म्हणतात. इथेही तेच घडतंय. जुने वाद, जुन्या शिव्या, जुने आरोप— हे सगळं 'रीसायकल बिन'मध्ये टाकून आता एकच नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातंय, ज्याचं नाव आहे: "मराठी अस्मिता २.०".एकीकडे भाजपा महायुती मुंबई २.०, मुंबई ३.० बनवून मुंबईला वेगवान आणि गतीशील बनवण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहेत. आणि दुसरीकडे…. मराठी अस्मिता २.० च्या रुपात जुनाच माल नव्या वेष्टनात विकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय… रम्याला त्याचं अस्तित्व कळून चुकलं… मराठी माणूस म्हणजे ‘इमोशनल पॉवर बँक’ कॉर्पोरेट मर्जरमध्ये जसं कर्मचारी नसून ब्रँड व्हॅल्यू महत्त्वाची असते- तसंच इथे. मराठी माणूस हा इथे मतदार नाही, भागीदार नाही. तो आहे इमोशनल पॉवर बँक. रम्याच्या डोळ्यासमोर बॅनरमागचं लिटिकल स्टेटमेंट स्पष्ट दिसू लागलं… इथे मराठी माणूस हा मतदार नसून एक 'इमोशनल पॉवर बँक' झाला आहे. जेव्हा जेव्हा ठाकऱ्यांच्या सत्तेची बॅटरी लो होते, तेव्हा तेव्हा या पॉवर बँकेतून 'अस्मितेचा' करंट ओढला जातो. बॅनरवर त्याचं नाव, भाषणात त्याचा उल्लेख, पण महापालिकेच्या बजेटमध्ये त्याचा पत्ताच नसतो. मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका. गेल्या कित्येक दशकांपासून या महापालिकेची तिजोरी एकाच कुटुंबाच्या चावीने उघडत होती. आता ती चावी हरवण्याची भीती वाटू लागली, की मग भावांना भावांची आठवण येते. हा विकास नाही, ही 'जहागीरदारी' टिकवण्यासाठी केलेली सोयीची युती आहे. त्याच्या नावावर बॅनर, त्याच्या नावावर भाषणं, आणि त्याच्या खऱ्या प्रश्नांवर नेहमीसारखंच मौन. रम्या विचार करू लागला, या बॅनरवर थोडा बदल केला तर? जर तिथे असं लिहिलं की- “राज आणि उद्धव, जागे व्हा… ही तुमच्या अस्तित्वाची शेवटची लढाई आहे,” तर ते किती प्रामाणिक वाटलं असतं! कारण रम्या तर रोजच लढतोय. लोकलच्या गर्दीत, कामाच्या डेडलाईन्सशी आणि महिन्याच्या अखेरीस वाढणाऱ्या बिलांशी. त्यावेळी रमेशला कुणीही 'अस्तित्वाच्या' नावाखाली हाक मारत नाही. त्याच्या अस्तित्वाला फक्त मतदान करताना आठवलं जातं. BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching