कोविड जंबो सेंटरचा 'जंबो' घोटाळा? मुंबईकरांच्या जिवाशी खेळ आणि पैशांची लूट!
Videos"जेव्हा संपूर्ण मुंबई कोरोनाच्या भीषण संकटाशी लढत होती, तेव्हा काही लोक मात्र या आपत्तीत स्वतःचा फायदा शोधण्यात मग्न होते. या व्हिडीओमध्ये 'कोविड जंबो सेंटर्स'च्या नावाखाली झालेल्या कथित घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव मांडले आहे. ज्या कंपन्यांना वैद्यकीय क्षेत्राचा कोणताही अनुभव नव्हता, त्यांना केवळ ओळखीच्या जोरावर कोटींची कंत्राटे देण्यात आली. इतकेच नाही तर केवळ कागदावर डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची बोगस संख्या दाखवून मुंबई महानगरपालिकेची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेत नियमांना हरताळ फासला गेला आणि मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून आपल्याच जवळच्या लोकांचे खिसे भरण्याचे काम सुरू झाले. मुंबई महानगरपालिका ही मुंबईकरांच्या सेवेसाठी आहे की केवळ एका कुटुंबाचा 'फॅमिली बिझनेस' चालवण्यासाठी, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे संकटाच्या काळात झालेल्या त्या भ्रष्टाचाराचा आरसा आहे, ज्याने सामान्य मुंबईकरांचा विश्वासघात केला. हा व्हिडीओ नक्की पाहा आणि विचार करा!" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching