मुंबईकरांच्या नशिबी 'सांडपाणी' आणि नेत्यांच्या खिशात 'लोणी'! २ दशकांचा मास्टरक्लास!
Videos"मुंबईला 'इंटरनॅशनल सिटी' बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना कदाचित सांडपाण्यात आणि दुर्गंधीत जास्त रस असावा. २००२ चा एसटीपी प्रकल्प चक्क २० वर्ष रेंगाळला. या २० वर्षात मुंबईकरांना काय मिळालं? तर नद्यांच्या नावाखाली वाहणारे उघडे नाले आणि श्वासाश्वासाला लागलेली प्रदूषणाची धाप. जेव्हा प्रशासन 'फॅमिली बिझनेस' सारखं चालतं, तेव्हा टेंडर कॅन्सल होतात आणि फक्त नेत्यांच्या तिजोरीचा आकार वाढतो. सामान्य मुंबईकर मात्र काय करतोय? प्रदूषणाने भरलेल्या हवेत श्वास घेतोय. डेंग्यू, मलेरिया आणि श्वसनाचे नवनवीन आजार आनंदाने (नाईलाजाने) कुरवाळतोय. रुग्णालयात रांगा लावून आपल्या कष्टाची कमाई औषधांवर उडवतोय. २६,००० कोटींचा हा 'उशिरा सुचलेला शहाणपणा' म्हणजे विकास नसून मुंबईकरांच्या आरोग्याशी केलेला क्रूर विनोद आहे. अखेर, बीएमसी म्हणजे काही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही की जिथे जनतेच्या जीवापेक्षा 'परिवाराची' मर्जी महत्त्वाची ठरेल." BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching