कामचलाऊ महाविकास आघाडी - फक्त कामबिघाडी - और बोलती है 'चलती का नाम गाडी!'
Videos"रिक्षात धड बसायला जागा नाही, पण स्वप्न मात्र अख्ख्या मुंबईवर राज्य करायची आहेत. मुंबईत रिक्षा सहजासहजी मिळत नाही असे म्हणतात, पण इथे तर अख्खी 'आघाडी'च एका रिक्षात घुसायचा प्रयत्न करतेय! रिक्षामध्ये जागा आहे तीन प्रवाशांची, पण हट्ट मात्र असा की, ""पूर्ण गोतावळा मावलाच पाहिजे."" उद्धवजी ड्रायव्हरच्या मागे सेट झालेत, शरद पवार तांत्रिक सल्ला देत बसलेत आणि राज ठाकरेंना मात्र फक्त 'कॉर्नर सीट' हवीय (कारण तिथून बाहेरचे वारे नीट दिसतात!) बिचारे राहुल गांधी बाहेरून ""अलायन्समध्ये मी पण आहे"" म्हणत खिडकीतून डोकावत आहेत, पण रिक्षावाला मात्र कडक आहे. तो आरसा दाखवतोय की, रिक्षात सीट नाही आणि तुमच्या धोरणात नीट 'फिट' बसायलाही जागा नाही. नियमांची ऐशीतैशी करून सत्तेच्या प्रवासाला निघालेल्या या कम्पूची अवस्था म्हणजे 'हौस प्रवाशांना आणि त्रास मुंबईकरांना' अशी झाली आहे. पालिकेचा पैसा हा जनतेच्या घामाचा पैसा आहे, ती काय कोणाची खासगी मालमत्ता नाही की प्रत्येकाच्या मर्जीप्रमाणे खर्च होईल!" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching