"बाळ अन् बाळाचे पाय अजूनही पाळण्यात... पण पेंग्विनचे पाय मात्र वातानुकूलित यंत्रात; अन् मुंबईकर मात्र खड्ड्यात...!"
Videos"अरेरे...! बाळाची कॅसेट अडकली आहे ती कोणीतरी मोकळी करा रे...! बाळाने एवढा अभ्यास लहानपणी केला असता तर कदाचित आज मुंबईतल्या मराठी शाळा जिवंत राहिल्या असत्या. फक्त पेंग्विनवर लक्ष न देता मुंबईच्या रस्त्याकडे लक्ष दिले असते. मराठीत म्हण आहे की 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात', म्हणजे भविष्यात तो काय करणार हे लहानपणीच कळते. या व्हिडीओतही साहेबांचे पाय (आणि हातवारे) पाहून स्पष्ट दिसतेय की त्यांचे लक्ष मंत्रालयात नसून 'झू' (Zoo) मध्ये जास्त आहे. जेव्हा एखादा नेता राज्याच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी, एखादे लहान मूल चॉकलेट मागावे तसा पेंग्विनचा हट्ट धरतो, तेव्हा समजावे की राजकारण आता 'चिल्ड्रन्स पार्क' झाले आहे. बाळाला खेळणी मिळाली की ते कसे खूश होते, अगदी तसेच साहेब पेंग्विनची मागणी करताना आनंदी दिसत आहेत. बिचाऱ्या पेंग्विनलाही वाटले नसेल की अंटार्क्टिका सोडून आपल्याला मुंबईच्या राजकारणात 'स्टार प्रचारक' बनावे लागेल! महाराष्ट्र 'पुरोगामी' होताच, आता साहेबांच्या कृपेने तो 'बर्फागामी'सुद्धा होईल. जनतेने कितीही ओरडून मागितले तरी रस्ते मिळणार नाहीत, पण साहेबांनी एकदा का बोट दाखवले की पेंग्विनसाठी स्पेशल विमानाचे तिकीट नक्की मिळणार!" BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching